samata logo
Home / Services / Retirement Plan
retairment_plan
समता सेवक सेवानिवृत्ती आधार योजना


        समताचे यशात कर्मचारी व अधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे समताचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दरवर्षी भरघोस पगारवाढ, बोनस, ग्रॅच्युइटी, प्रॉ. फंड याद्वारे प्रयत्न केलेला आहे. तसेच कर्मचारी व अधिकारी यांना दुचाकी व चारचाकी वाहन ०% व्याजदराने दिलेले आहे. एवढेच नव्हेतर खरेदीसाठी अनुदानही दिले आहे. याहीपुढे जावुन १ एप्रिल २०१४ पासून 'समता सेवक सेवानिवृत्ती आधार योजना' देखील सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याचे या आधार योजनेचे खात्यात सेवानिवृत्त योजनेची रक्कम दरमहा जमा केली जाईल व संबंधित कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर या संचित रकमेच्या व्याजाद्वारे भरघोस अशाप्रकारचे पेन्शन या योजनेद्वारे मिळेल.