आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी खरोखरच अतुलनीय व्याजदरावर सुवर्ण कर्ज मिळवा.
अशी सुरू झाली आपली समता
कोपरगाव शहरातील छोट्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने११ मे १९८६ रोजी कोपरगावातल्या शिवाजी रस्त्यावर समता पतसंस्थेची स्थापना झाली.१० बाय १५ च्या आवारातएक लाख रुपयांचे भागभांडवल, तीन लाख रुपयांच्या ठेवी आणि ७०० सदस्य हीच काय ती त्यावेळी ‘समता’ची पुंजी होती. त्यावेळी बऱ्याचशा नागरी सहकारी पतसंस्था स्थिरस्थावर झाल्या होत्या. तालुक्यातील छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांना अडीनडीलाआधार देण्यासाठी या पतसंस्थांचं जाळं उभं राहिलं होतं.‘समता’ने स्थापनेपासूनच सहकार तत्त्वावर कामकाज करीत सहकाराची मूल्ये जपली १९९१ पर्यंत सुरवातीच्या चार वर्षात १ करोड रुपयाच्या ठेवी जमा झाल्या. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ‘समता’ने सतत आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला आणि मागे वळून पाहिलेच नाही. आज समता पतसंस्थेच्या१६ शाखा आणि२३ विस्तारित सोनेतारण कर्ज काउंटर आहेत आणि हे जाळेसंपूर्ण महाराष्ट्रभर विणले गेले आहे. या शाखा आणि सोनेतारण काउंटरद्वारे२४ मे २०२२ पर्यंत संस्थेने६७ हजार ९८२ सदस्यांशी आपले नाते जोडले होते.६६५ कोटी ८१ लाखांच्या ठेवी आणि ४९७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करताना संस्थेने आजवर१२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे..
महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांची चळवळ १९८६ ला सुरू झाली. ही चळवळ भरभराटीला आली, त्याचदरम्यान समता पतसंस्थेची स्थापना झाली, हा योगायोग होता. त्यानंतर‘समता’च्या आर्थिक विकासाचा आलेख दरवर्षी वाढतच राहिला. अर्थात या आर्थिक प्रगतीत संस्थेला अनेक संकटांचाही सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने चार अडथळ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.२००६ मध्ये समता पतसंस्थेच्या ठेवी ५७ कोटी रुपये होत्या. मात्र,६ डिसेंबर २००६ रोजी वर्तमानपत्रांत छापून आलेल्या प्रतिकूल बातम्यांमुळे ‘समता’च्या ठेवी कमी होऊ लागल्या.