समता पतसंस्था बद्दल

अशी सुरू झाली आपली समता

कोपरगाव शहरातील छोट्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने११ मे १९८६ रोजी कोपरगावातल्या शिवाजी रस्त्यावर समता पतसंस्थेची स्थापना झाली.१० बाय १५ च्या आवारातएक लाख रुपयांचे भागभांडवल, तीन लाख रुपयांच्या ठेवी आणि ७०० सदस्य हीच काय ती त्यावेळी ‘समता’ची पुंजी होती. त्यावेळी बऱ्याचशा नागरी सहकारी पतसंस्था स्थिरस्थावर झाल्या होत्या. तालुक्यातील छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांना अडीनडीलाआधार देण्यासाठी या पतसंस्थांचं जाळं उभं राहिलं होतं.‘समता’ने स्थापनेपासूनच सहकार तत्त्वावर कामकाज करीत सहकाराची मूल्ये जपली आणि १९९१ पर्यंत सुरवातीच्या चार वर्षात १ करोड रुपयाच्या ठेवी जमा झाल्या. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ‘समता’ने सतत आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला आणि मागे वळून पाहिलेच नाही. आज समता पतसंस्थेच्या१६ शाखा आणि२३ विस्तारित सोनेतारण कर्ज काउंटर आहेत आणि हे जाळेसंपूर्ण महाराष्ट्रभर विणले गेले आहे. या शाखा आणि सोनेतारण काउंटरद्वारे२४ मे २०२२ पर्यंत संस्थेने६७ हजार ९८२ सदस्यांशी आपले नाते जोडले होते.६६५ कोटी ८१ लाखांच्या ठेवी आणि ४९७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करताना संस्थेने आजवर१२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांची चळवळ १९८६ ला सुरू झाली. ही चळवळ भरभराटीला आली, त्याचदरम्यान समता पतसंस्थेची स्थापना झाली, हा योगायोग होता. त्यानंतर‘समता’च्या आर्थिक विकासाचा आलेख दरवर्षी वाढतच राहिला. अर्थात या आर्थिक प्रगतीत संस्थेला अनेक संकटांचाही सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने चार अडथळ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.२००६ मध्ये समता पतसंस्थेच्या ठेवी ५७ कोटी रुपये होत्या. मात्र,६ डिसेंबर २००६ रोजी वर्तमानपत्रांत छापून आलेल्या प्रतिकूल बातम्यांमुळे ‘समता’च्या ठेवी कमी होऊ लागल्या. या स्थितीतही समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे व संचालक मंडळ डगमगले नाही. सभासदांच्या ठेवी सभासदांना परत केल्या व संकटावर यशस्वीपणे मात केली. साहजिकच२००७पासून संस्थेच्या ठेवी पुन्हा वाढू लागल्या. त्यानंतर २००९ मध्येही ‘समता’ला एका अस्मानी संकटाचा सामना करावा लागला. त्यावर्षी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे आलेल्या पुरामुळे रस्त्यावर२० फुटांपर्यंत पाणी साचले होते.साहजिकच संस्थेचे मुख्य कार्यालय जलमय झाले. याची संधी साधत विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. मात्र,‘समता’ने ठेवीदारांना दिलेल्या विश्वासाला अन् त्यांच्या ठेवींना धक्का लागू दिला नाही. पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘समता’च्या भव्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये कार्यालय सुरू करण्यात आले आणित्यानंतर ठेवी पुन्हा वाढू लागल्या.

सन २०१६ मध्ये पतसंस्था चळवळीतील सर्वच पतसंस्थांना संकटाचा सामना करावा लागला. अर्थातच‘समता’समोरही संकट उभे राहिले. ८ नोव्हेंबर २०१६रोजी केंद्र सरकारने १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आणि साहजिकच सर्व बँका आणि पतसंस्थांमध्ये घबराट पसरली.समता पतसंस्थेलाही या संकटाचा सामना करावा लागलाच. सर्व ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पाठोपाठ संस्थेच्या ठेवी कमी होऊ लागल्या; पण या संकटाला आपत्ती मानण्याऐवजी ‘समता’ने इष्टापत्ती मानली अन् समस्या सोडवली. संस्थेच्या कारभारात बदल केला, ठेवीदारांचा विश्वास परत मिळवला आणि त्यांच्या ठेवींना सुरक्षितता दिली.‘समता’ पुन्हा एकदा आर्थिक क्षेत्रात सावरायला लागली.

मार्च २०२० मध्येही कोरोना महामारी आली. ही महामारी केवळ राज्यात नव्हती, तर जगभरात होती. त्यामुळे महाराष्ट्रात ४ महिने पूर्ण लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनच्या काळात रोजगार निर्मिती, उद्योगधंदे, व्यवसाय पूर्ण बंद होते. साहजिकचठेवीदारांनी दैनंदिन खर्चासाठी ठेवी काढायला सुरुवात केली, कर्जदारांकडेही कर्जाचे हप्ते भरायला पैसे नव्हते. या परिस्थितीतही २०१९-२० या आर्थिक वर्षातरोख ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाली. आजही वाढ सातत्याने होत आहे. या कोरोना महामारीच्या काळात ‘समता’तील बचतीनेही‘समता’चे ग्राहक आणि सदस्यांना दिलासा दिला.

जगभर आधुनिकतेचे, नवीन तंत्रज्ञानाचेवारे वाहत असताना ‘समता’नेहीकारभारात आमूलाग्र बदल केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘समता’ संस्थेच्या प्रत्येक ग्राहक व सदस्याच्या घराघरात पोहोचली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद साधणे आणि संस्थेच्या सेवा त्वरित पुरवणेही सोपे झाले आहे. आर्थिक व्यवहारही ऑनलाइन यशस्वीपणे होत असल्यानेविश्वास + सुरक्षितता = समताहेसंस्थेचे ब्रीदवाक्यहीमहाराष्ट्रातील प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचले आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे समता पतसंस्थेचे वार्षिक अंदाजपत्रकही दरवर्षी ३० मार्च रोजीच प्रकाशित केले जाते. त्यामुळे ३० मार्च रोजी वार्षिक अंदाजपत्रक प्रकाशित करणारी मुंबईवगळता महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था म्हणून ‘समता’चीओळख आहे.

समता पतसंस्थेने भारतातील पतसंस्था चळवळीत नवनवीन योजना व उपक्रम राबविण्याचा मान मिळविला असून, महाराष्ट्रातील संपूर्ण बँकिंग चळवळीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अशा सुविधा विकसित करणारी समता ही पहिली पतसंस्था आहे. ‘समता’त वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाइल बँकिंग, पेपरलेस बँकिंग, नेट बँकिंग, कोअर बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, ई-दस्तावेज, लॉकर सुविधा, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, ऑनलाइन समता रिकव्हरी पॅटर्न, ऑनलाइन व्हाउचरलेस बँकिंग मोड, UPI सिस्टीमद्वारे QR कोड, समता लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन स्कीम या योजनांचा समावेश आहे.‘समता’ठेवीदारांच्या ठेवींना ९९.५५ टक्के संरक्षण देते. या अंतर्गत प्रत्येकी २२ लाखांचे संरक्षण देण्यात आले आहे. ही योजना संस्थेच्या आर्थिक बळकटीसाठी आणि प्रगतीसाठी एक चांगली बाजू ठरली आहे.

समता पतसंस्थेमार्फत सभासद ग्राहकांसाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यातसमता कुटुंब कल्याण योजना, खात्रीशीर विक्री, खात्रीशीर परतावा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन योजना, बालगौरव ठेव योजना, शेतकर्‍यांसाठी कमी व्याजदरावरसोनेतारण कर्ज योजना,महिलांच्या ठेवींवर विशेष व्याज ही खास महिला सक्षमीकरणासाठीचीयोजना, महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यासारख्या योजना ‘समता’ यशस्वीपणे राबवत आहे. समता नागरीसहकारी पतसंस्था व समता महिला बचत गटाने अगरबत्ती, कापूर आदींचे उत्पादन करून तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या या उत्पादनांना योग्य बाजारपेठही उपलब्ध करून दिली आहे आणि ‘समता’च्या सहकार मिनी मॉलमध्ये त्यांना हक्काने विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळात अनाथ, गरजू लोकांना जेवणाच्या डब्यांचे वाटप, मोफत मास्कवाटप, मोफत हँड सॅनिटायझरचे वाटप आदी सामाजिक उपक्रमांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समता पतसंस्थेलाआजवर सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि तज्ज्ञांनी भेटी देऊन संस्थेच्या आर्थिक प्रगतीची, कार्यप्रणालीची माहिती घेतली आहे.त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ संस्थेला झाला आहे.