बचत करणे म्हणजे फक्त पैसे जमा करणे नाही, तर आपल्या भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण करणे आहे. आमच्या सेव्हिंग्ज खात्यात मोबाईल बँकिंगची सुविधा आणि त्वरित एसएमएस अलर्ट मिळतात. मासिक व्याज थेट आपल्या खात्यात जमा होत असल्याने आपली रक्कम सतत वाढत राहते. आजच सुरुवात करा आणि स्वातंत्र्य व वाढ देणारे बँकिंग अनुभवा.

आपला व्यवसाय जितका गतिमान आहे, तितकाच विश्वासार्ह भागीदार त्याला हवा. समता करंट खाते हे कंपन्या, भागीदारी फर्म, ट्रस्ट आणि संस्थांसाठी खास डिझाइन केलेले आहे. सोपी कागदपत्रे आणि व्यवहारांमध्ये लवचिकता यामुळे दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होते. आपण आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा, आर्थिक व्यवस्थापन आम्ही सांभाळतो.

आज घेतलेले छोटे व शिस्तबद्ध पाऊल उद्या मोठ्या आर्थिक टप्प्यांत रूपांतरित होऊ शकते. समता SIP द्वारे आपण दरमहा सोप्या रकमेपासून गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकता. कंपाउंडिंगची ताकद आणि रुपये-कॉस्ट अॅव्हरेजिंगमुळे सातत्यपूर्ण वाढ मिळते. कौटुंबिक ध्येये, निवृत्ती किंवा भविष्यातील स्वप्ने असोत—आपली गुंतवणुकीची वाटचाल इथूनच सुरू होते.

आमच्याबद्दल

समता नागरी सहकारी पतसंस्था - सहकाराची यशस्वी गाथा

महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे केंद्र आहे आणि गेली ३९ वर्ष, समता नागरी सहकारी पतसंस्था या चळवळीची मशाल घेऊन उभी आहे. कोपरगाव येथे मुख्यालय आणि २० पेक्षा अधिक शाखांच्या माध्यमातून, समता लोकांच्या मेहनतीच्या पैशावर मोठे आणि सातत्यपूर्ण परतावे देऊन त्यांचा विश्वास जपण्याचे काम करत आहे. या प्रवासात, आम्ही लोकांना योग्य आर्थिक सल्ला आणि सेवा देण्यासोबतच, बदलत्या बँकिंग क्षेत्राशी सुसंगत आधुनिक सेवा देणारी संस्था म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. समतामध्ये, आम्ही दररोज आणि नेहमीच लोकांचा आमच्यावरील विश्वास दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

  • ३९
    वर्षांचा वारसा
  • २०+
    शाखा
  • ₹२५९
    कोटी गुंतवणूक
  • ₹६०८
    कोटींचे सोन्यावर कर्ज
  • ₹११३९
    कोटींच्या ठेवी
  • ₹८६७
    कोटींचे कर्ज वितरण

आमच्या सेवा

समता नागरी पतसंस्था नेहमीच गुंतवणुकदारांची वाढ आणि सोयीसाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे, गुंतवणूकदारांना सुलभ आणि सोप्या व्यवहारांचा अनुभव मिळतो.

मोबाईल
बँकिंग

समता ॲपवर एका क्लिकवर बँकिंग सेवा उपलब्ध.

पैसे हस्तांतरण
(मनी ट्रान्सफर)

RTGS, NEFT आणि IMPS द्वारे जलद पैसे हस्तांतरणाचा लाभ घ्या.

लॉकर
सुविधा

तुमच्या मौल्यवान वस्तूंसाठी अत्याधुनिक सुरक्षित व्हॉल्ट.

मायक्रो
एटीएम

डेबिट कार्डने पैसे काढण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये प्रथमच ही सुविधा.

कागदविरहित बँकिंग
(पेपरलेस बँकिंग)

ग्राहकांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, ज्यामुळे सुरक्षितता आणखी वाढते.

तुमच्या सोन्याला द्या,
योग्य किंमत!

अडीअडचणीला किंवा तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, सोनं तारण ठेवून घेतलेले कर्ज तुम्हाला तातडीने पैसे मिळवून देते. समतामध्ये, तुम्हाला सोन्याच्या मूल्याच्या ९०% पर्यंत कर्ज मिळू शकते.

१० ग्रॅम सोन्यावर

₹ ८७,०००/-

पर्यंत सोन्यावर कर्ज

१४

मिनिटांत
कर्जमंजुरी

०६%

किमान वार्षिक
व्याजदर

समताचे उपक्रम

कोपरगावच्या लोकांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी समताने अनेक उपक्रम राबवले आहेत. आर्थिक बाबींबरोबरच शिक्षण, सहकार क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्येही समताचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

समता शिक्षण

कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलने (CBSE) या भागातील शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे.

समता अपडेट्स

स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी 'समता वार्ता' नावाचे ऑनलाइन पोर्टल नियमितपणे चालवले जाते.

समता सोबती

अनेक आर्थिक संस्थांना पाठिंबा आणि सल्ल्याची गरज असताना समता त्यांचा विश्वसनीय भागीदार आणि मित्र झाली आहे.