समता पतसंस्थेबद्दल
आमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली…
११ मे १९८६... हा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. कारण याच दिवशी आमच्या स्वप्नांना साकारण्यासाठी एक मोठे पाऊल आम्ही उचलले. कोपरगावच्या शिवाजी रोडवरील एका १० बाय १५ फुटांच्या छोट्या जागेत समता पतसंस्थेने आपला प्रवास सुरू केला.
१ लाख रुपयाचे भांडवल, ३ लाख रुपयांच्या विश्वासार्ह ठेवी आणि ७०० सभासदांनी आम्हाला हा पाया रचतांना साथ दिली. आणि त्यांच्या साथीने आम्ही ही सुरुवात केली. सहकाराच्या तत्त्वांवर आधारित, समताने कमी वेळात एक कोटींच्या ठेवी जमा केल्या.
अध्यक्ष श्री. काकासाहेब कोयटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली समताची सतत प्रगती होत राहिली. आज, आम्ही २० शाखा आणि २३ गोल्ड लोन काउंटरच्या माध्यमातून १ ,००,०००+ लोकांशी जोडले गेलो आहोत. समताने अभिमानाने १,००० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला असून ६०० कोटींच्या गोल्ड लोनने अनेकांच्या स्वप्नांना साकारले आहे.
आम्ही आमच्या मूल्यांवर विश्वास ठेवून नेहमीच आव्हानांवर मात केली आहे. २००६ मधील नकारात्मक प्रचार, २००९ मधील पूर, २०१६ मधील नोटाबंदी आणि २०२० मधील महामारी याकाळातही आम्ही धैर्याने उभे राहिलो आणि प्रगतीपथाची आस सोडली नाही.
दरवर्षी ३१ मार्च रोजी वार्षिक अंदाजपत्रक प्रकाशित करणारी समता ही महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून, आम्ही मोबाईल बँकिंग, कोअर बँकिंग, UPI, कागदविरहित बँकिंग आणि ई-डॉक्युमेंटेशन यांसारख्या सेवा आमच्या पोर्टफोलिओमध्ये जोडल्या आहेत.
लिक्विडीटी प्रोटेक्शन फंड अंतर्गत ९९.९३ % ठेवीदार यांना रक्कम रु.५५ लाखांपर्यंत सुरक्षित ठेवी. महिला ठेवीदारांसाठी विशेष व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना, शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज, तरुणांसाठी विशेष ठेव योजना आणि महिला बचत गटांना सतत पाठिंबा - अशा अनेक उपक्रमांद्वारे समता समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत आहे.
अनेक सामाजिक कार्यांना सक्रियपणे पाठिंबा देऊन, समताने लाखो लोकांचा विश्वास संपादन केला आहे आणि नेहमीच लोकांच्या हिताला प्राधान्य देणारी संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे
संस्थापक आणि अध्यक्ष
समता नागरी पतसंस्था
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था महासंघ
कोषाध्यक्ष
एशियन कॉन्फेडरेशन क्रेडिट युनियन
संचालक मंडळ
आमचे ध्येय
ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देणे.
सर्वांसाठी बँकिंग अधिक सोपे आणि जलद करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आमच्या सामाजिक बांधिलकी पूर्ण करून प्रत्येकाच्या प्रगतीसाठी योगदान देणे.
आमची दृष्टी
समताला आर्थिक समृद्धीचा एक विश्वसनीय स्रोत म्हणून नावारुपास आणणे.
आधुनिक आणि सुरक्षित सेवा सामान्य माणसापर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवणे आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक वाढीला चालना देणे.
आर्थिक परिस्थिती
| Years | Member | Deposits (Amounts in rupees) | Loan | Gold Loan | Investment | Audit Group |
|---|---|---|---|---|---|---|
| 1900-91 | 1,315 | 35,92,767 | 36,48,035 | - | 4,95,500 | "A" |
| 1995-96 | 1,315 | 2,76,55,391 | 25,70,14,329 | - | 4,691,350 | "A" |
| 2000-01 | 1,315 | 22,16,11,850 | 14,83,04,900 | - | 5,60,07,600 | "A" |
| 2005-06 | 1,315 | 57,11,44,023 | 39,83,24,910 | - | 21,86,62,270 | "A" |
| 2011-12 | 1,315 | 12,42,087,840 | 89,12,19,462 | - | 46,05,51,655 | "A" |
| 2016-17 | 10,779 | 3,72,26,94,841 | 2,68,61,46,769 | 3,14,18,891 | 1,21,35,08,555 | "A" |
| 2017-18 | 17,398 | 3,63,13,35,415 | 2,45,26,13,955 | 6,96,40,136 | 1,41,02,17,774 | "A" |
| 2018-19 | 30,996 | 4,33,23,83,025 | 3,00,89,80,275 | 12,25,66,861 | 1,60,71,41,729 | "A" |
| 2019-20 | 48,014 | 5,32,39,08,274 | 3,78,62,69,793 | 40,22,06,099 | 1,76,63,82,584 | "A" |
| 2020-21 | 56,758 | 6,00,02,64,247 | 4,54,44,37,362 | 93,41,71,785 | 1,76,13,70,812 | "A" |
| 2021-22 | 66,442 | 6,61,47,56,639 | 4,82,42,55,117 | 1,71,84,62,404 | 1,74,15,20,436 | "A" |
| 2022-23 | 77,178 | 7,91,93,87,535 | 5,14,26,10,425 | 2,38,17,32,747 | 2,70,28,17,734 | "A" |
| 2023-24 | 87,537 | 9,23,65,97,799 | 6,42,42,51,768 | 3,53,56,63,144 | 2,79,92,40,785 | "A" |
| 2024-25 | 97,349 | 10,36,79,91,838 | 7,95,53,65,385 | 4,98,91,59,067 | 2,70,82,96,998 | “A” |
| 9/30/2025 | 1,01,643 | 11,39,25,14,030.12 | 8,67,04,85,122 | 6,08,19,96,366 | 2,59,94,75,186 |





