सेवा अनेक, वचन एक!

ग्राहकांच्या १००% विश्वास आणि विचाराचा ध्यास!

मोबाइल बँकिंग

गेल्या काही काळापासून बँकिंग आणि व्यवहार आता एका क्लिकवर झालं आहे. म्हणूनच, आम्ही समतामध्ये, आमच्या ग्राहकांसाठी हीच सुविधा घेऊन आलो आहोत. सादर आहे, समता मोबाईल बँकिंग ॲप. डिपॉझिट्सपासून ते आरटीजीएस (RTGS), आयएमपीएस (IMPS) आणि एनईएफटी (NEFT) सारख्या फंड ट्रान्सफरपर्यंत आणि स्टेटमेंट डाउनलोड करण्यापासून इतर अपडेट्‌सपर्यंत आता सर्व काही तुमच्या फोनवर फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे.

जर तुम्हाला समता मोबाईल बँकिंग ॲप हवं असेल तर ते आता प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे.

मोबाईल बँकिंग आता अगदीच सोपे!

समता मोबाईल बँकिंग ॲप वापरण्यासाठी ४ सोप्या पायऱ्या

पायरी 1

प्ले-स्टोअरमधून ॲप डाउनलोड करा.

पायरी 2

'न्यू यूजर रजिस्ट्रेशन' लिंकवर क्लिक करा.

पायरी 3

मोबाईल बँकिंग ॲपसाठी 'ऑनलाइन रजिस्ट्रेशन' निवडा.

पायरी4

तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी तुमची माहिती भरा.

पैसे हस्तांतर (मनी ट्रान्स्फर)

आपण हे पाहातच आहोत की बदलत्या काळापासून ऑनलाइन व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने, लोकांना पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी सोपे आणि विश्वासार्ह पर्याय हवे आहेत. डिजिटल फसवणुकीमुळे ऑनलाइन ट्रान्सफर सेवा वापरताना थोडी साशंकता ग्राहकांच्या मनात जाणवते. अशा परिस्थितीत, समता एक विश्वासार्ह उपाय घेऊन आली आहे.

समता ग्राहकांना एका सोप्या इंटरफेससह मनी ट्रान्सफरचा पर्याय देते. ज्यामुळे ऑनलाइन मनी ट्रान्सफर अगदी सोपे होते. समता मनी ट्रान्सफर सेवा सर्व प्रकारच्या ऑनलाइन ट्रान्सफर सिस्टीमला सपोर्ट करते, जसे की एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS) आणि आयएमपीएस (IMPS). सुरक्षित पेमेंट गेटवे (gateway) आणि वापरण्यास सोप्या नेव्हिगेशन सिस्टीममुळे (navigation system) समताची मनी ट्रान्सफर सेवा आधीच अनेक ग्राहक वापरत आहेत आणि वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे.

एनईएफटी
आरटीजीएस
आयएमपीएस

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)

एनईएफटी (NEFT) सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • मनी ट्रान्सफरसाठी किफायतशीर पद्धत.
  • सुरक्षित प्लॅटफॉर्म.
  • चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देण्याची गरज नाही.
  • पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.
  • ऑनलाइन फंडचे सुरक्षित हस्तांतरण.
  • स्वतःच्या खात्यातून स्वतःच्याच दुसऱ्या खात्यातही पैसे पाठवता/मिळवता येतात.
  • अधिक सोयी-सुविधांसह जलद व्यवहार.

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)

आरटीजीएस (RTGS) सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • एनईएफटीपेक्षा पैसे ट्रान्सफर करण्याचा जलद मार्ग.
  • रिअल-टाइम व्यवहार.
  • लाभार्थीच्या खात्यात ट्रान्सफर प्रक्रिया ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात.
  • २ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी सर्वोत्तम पर्याय.
  • स्वतःच्या खात्यातून स्वतःच्याच दुसऱ्या खात्यातही पैसे पाठवता/मिळवता येतात.

इमीडिएट पेमेंट सर्विस (IMPS)

आयएमपीएस (IMPS) सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • आंतर-बँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुविधा.
  • २४x७ (सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा) वर्षभर उपलब्ध.
  • कोणताही विलंब न होता तात्काळ पैसे हस्तांतरण.
  • ५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी सर्वोत्तम पर्याय.
  • स्वतःच्या खात्यातून स्वतःच्याच दुसऱ्या खात्यातही पैसे पाठवता/मिळवता येतात.

लॉकर सुविधा

ग्राहकांकडे कष्टानं खरेदी केलेले सोने, दागिने आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू असतात. पण त्या घरी ठेवणे हे कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित नसते. चोरी, दरोडा किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे सुरक्षिततेबाबत शंका निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपल्या मौल्यवान वस्तू समतामधील सुरक्षित लॉकरमध्ये ठेवता येतात.

आमच्या बहुतेक शाखांमध्ये उपलब्ध असलेली ही लॉकर सुविधा, तुमचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी विश्वासार्ह आहे.

लॉकर सुविधेची वैशिष्ट्ये:

  • पूर्णपणे वातानुकूलितआणि अत्याधुनिक लॉकर.
  • नवीनतम बर्गलर अलार्म सिस्टीमने सुसज्ज.
  • तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध.
  • अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, लॉकरधारक एक पासकोड निर्माण करतो.
  • हे लॉकर वापरण्याकरिता तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना नॉमिनी करता येते.
ठिकाण पत्ता संपर्क
कोपरगाव समता मार्ग, खंदकनाला, कोपरगाव. ८०५५११९१५२
गांधी चौक गांधी चौक, कोपरगाव. ८०५५११९१५९
सूर्या कॉम्प्लेक्स सूर्या कॉम्प्लेक्स, कोपरगाव. ८०५५११९७८२
राहाता श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल, शिवाजी चौक, राहाता. ८०५५११९१५४
श्रीरामपूर किशोर सिनेफ्लेक्स, शिवाजी रस्ता, श्रीरामपूर. ८०५५११९१५६
येवला फत्तेबुरुज नाका, जंगली महाराज कमानीजवळ, येवला. ८०५५११९१५७
राहुरी रमण पुष्प कॉम्प्लेक्स, बस स्थानकासमोर, नगर-मनमाड रोड, राहुरी. ८०५५११९१६३
वैजापूर ठक्कर बझार कॉम्प्लेक्स,जुने एसटी बसस्थानक, वैजापूर. ८०५५११९१६२

मायक्रो एटीएम

बदलत्या काळानुसार डिजिटल व्यवहार जरी वाढत असले तरी, रोख रकमेची गरज कधीच संपणार नाही. अशा वेळी, रोख रक्कम काढण्याची सहज आणि सोपी व्यवस्था असणे खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकांसाठी सुविधा करण्यासाठी, समताने प्रथमच मायक्रो एटीएम सुरू केले आहे. यामुळे लोकांना कोणत्याही शाखेतून डेबिट कार्ड वापरून पैसे काढता येतील.

मायक्रो एटीएमची वैशिष्ट्ये:

  • दुर्गम (remote) ठिकाणी पैसे काढणे सोपे करते.
  • ग्रामीण बँकिंगच्या डिजिटायझेशनला सपोर्ट करते.
  • सुरक्षा आणि संरक्षणासाठी बायोमेट्रिक सक्षम आहे.
  • ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक भाषांना सपोर्ट करते.

पेपरलेस बँकिंग

एक पर्यावरण रक्षक संस्था म्हणून, समता सस्टेनेबल (sustainable) उपाय देण्यावर विश्वास ठेवते. याच विचारसरणीचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या कामकाजात महत्त्वाचा निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणावर पेपरलेस बँकिंगकडे वाटचाल केली आहे.

पेपरलेस बँकिंग वैशिष्ट्ये:

  • इलेक्ट्रॉनिक व्यवहार (NEFT/RTGS/IMPS).
  • डिजिटल स्वरूपात डाउनलोड करता येणारे खाते स्टेटमेंट उपलब्ध करून देणे.
  • ऑनलाइन पेमेंट आणि डिपॉझिट्स